पैसे हस्तांतर (मनी ट्रान्स्फर)

पैसे हस्तांतर (मनी ट्रान्स्फर)

समता पतसंस्थेनेपैसे हस्तांतरित करण्याचा सर्वात जलद मार्गही उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे तुमच्या खात्यातूनआता सहजगत्या पैसे ट्रान्स्फर करता येतील. ही पद्धत अतिशय सोपी आणि सोयीची आहे.पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी ऑनलाइन विविध पर्याय उपलब्ध आहेत.

रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट सिस्टीम (RTGS) आणि नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर सिस्टीम (NEFT) या दोन प्रणालींबरोबरही समताकाम करते. यामुळेअतिशय जलद, सुरक्षित, किफायतशीर आणि विश्वासार्ह अशा प्रणालींद्वारेग्राहकाला समतातून इतर बँकेत, तसेच इतर बँकांतून समतातील खात्यात पैसे पाठवणेसुलभ होते. देशभरातील कोणत्याही बँकेसोबत ग्राहकाला या प्रणालींद्वारेव्यवहार करता येतात.

एनईएफटी/आरटीजीएस/आयएमपीएस


नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर (NEFT)

एनईएफटी प्रणालीची वैशिष्ट्ये

  • पैसे हस्तांतरासाठीNEFT वापरणे किफायतशीर आहे.
  • NEFT एका सुरक्षित यंत्रणेने तयार केलेले आहे.
  • पैसे हस्तांतरासाठीधनादेश किंवा धनाकर्ष (DD) वापरण्याची गरज नाही.
  • पैसे हस्तांतरित करण्यासाठी तुम्हाला बँकेतजाण्याची आवश्यकता नाही.
  • या प्रणालीमुळे ऑनलाइन निधी हस्तांतर करणे अधिक सुलभ
  • या प्रणालीमुळे ग्राहक त्याच्या/तिच्या खात्यावर पैसे पाठवू शकतात, मागवूशकतात.
रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट(RTGS)

आरटीजीएस प्रणालीची वैशिष्ट्ये

एनईएफटीच्या तुलनेत आरटीजीएसद्वारे पैसे हस्तांतरित करणे अत्यंत जलद आहे.हे व्यवहार त्याच वेळी आणि तातडीने होतात. त्यामुळे तुमच्या खात्यातून लाभार्थीच्या खात्यात निधी हस्तांतरित होण्यासाठी30 मिनिटांपेक्षाही कमी वेळ लागतो.

ही अशी इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टीम आहे, ज्यात बँकांकडील सूचनांनुसार पेमेंटविषयीकार्यवाही केली जाते.दोन लाख रुपये आणि त्याहून अधिक मूल्याच्या व्यवहारासाठी ही प्रणाली वापरता येते. त्यामुळे ग्राहक त्याच्या/तिच्या खात्यावर कधीही पैसे पाठवू आणि मागवू शकतात.

इमिजीएट पेमेंट सर्व्हिस (IMPS)

आयएमपीएस प्रणालीची वैशिष्ट्ये

मोबाइल फोनवरून तातडीने पैसे हस्तांतरित करण्याची सुविधा म्हणजेIMPS. ही आंतरबँक इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतर सेवा आहे. ही सेवा बँकेच्या सुट्ट्या असल्या तरीही वर्षभर २४x७ उपलब्ध असते. कोणताही विलंब न करता त्याचवेळीतुमचे पैसे हस्तांतरित होतात.

समता पतसंस्थेनेही एटीएम, इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंग आदी विविध माध्यमांद्वारे या प्रणालीचा विस्तार केला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सर्व आणि प्रमुख खासगी बँकाही आताIMPS मध्ये सहभागी होत आहेत. पाच लाख रुपयांपर्यंतचे व्यवहारया प्रणालीद्वारे केले जातात.