samata logo
Home / Services / Other Services
Other Services
इतर सुविधा

समता केवळ ग्राहकांच्या ठेवी स्विकारणे व कर्ज देणारी संस्था नसून ग्राहकांच्या दैनंदिन जीवनात मार्गदर्शक करणारी संस्था असावी असा संचालक मंडळाचा प्रयत्न नेहमीच राहिला आहे. याच उद्देशाने समताच्या ग्राहकांसाठी खालील सेवा सुरु करत आहे.आयकर मार्गदर्शन केंद्र :-
समताचे ठेवीदारांना आयकराबाबत विविध शंका असतात या शंकाचे निरसन आयकर तज्ञांकडून करून देण्यासाठी स्वतंत्र कक्षाची नेमणूक करण्यात आलेली आहे. या केंद्रामधून ग्राहकांना समाजातील गुंतवणूकीबाबत व इतरही आयकराबाबत या शंकांचे निवारण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

व्यवसाय मार्गदर्शन केंद्र :-
सुशिक्षित बेरोजगारांवर लघुउद्योग सुरु करण्यासाठी उद्योग क्षेत्रातील तज्ञांकडून कोणता उद्योग करावा व त्या उद्योगाची संपूर्ण माहिती तज्ञांनकडून देण्याचा उपक्रम देखील सुरु करीत आहोत. होतकरू तरुण करू इच्छित असलेल्या उद्योगासाठी मशिनरी कोठे मिळेल जागा कोठे उपलब्ध होऊ शकेल, शासकीय अनुदान किंवा आर्थिक सहाय्य कुठून उपलब्ध होऊ शकेल एवढ्याच नाही तर इतरही व्यवसाय उद्योग उभारणीसाठी समताकडून अर्थसहाय्य देखील उपलब्ध करून देण्यात येईल.

गुंतवणूक मार्गदर्शन :-
समताचे ग्राहकांना समताचे व्यतिरिक्त म्युचल फंड, विमा, शेअर्स, सोने, इ. ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी मार्गदर्शन देण्याचे काम या केंद्रामार्फत तज्ञांकडून केली जाईल.

जीवनावश्यक वस्तू वितरण :-
ग्राहकांचे आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध आयुर्वेदिक उत्पादने विशेषतः योग गुरु रामदेवबाबा यांच्या पतंजलीची उत्पादने तसेच पतंजली निर्मीत जीवनावश्यक वस्तू या केंद्रामार्फत माफक दारात ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येतील.