ज्यांना ठराविक कालावधीसाठी नियमित बचत करायची असते आणि जास्त व्याजदर हवा असतो, ते आवर्ती ठेव खाते उघडतात. आवर्ती ठेव खात्यात ठराविक रक्कम दर महिन्याला एका विशिष्ट कालावधीसाठी घेतली जाते आणि विशिष्ट मुदतीच्या शेवटी एकूण रक्कम व्याजासह परत केली जाते.
आवर्ती ठेव ही समता पतसंस्थेने लागू केलेली एक विशिष्ट मुदत ठेव योजना आहे. या योजनेत पगारदार किंवा दरमहा निश्चित उत्पन्न असलेल्या मंडळींना दरमहा एक ठराविक रक्कम जमा करता येते.त्याद्वारे त्यांना मुदत ठेवींच्या समतुल्य व्याज मिळते.