फॉरेन्सीक ऑडिट कंट्रोल रूम
प्रत्येक सहकारी किंवा खाजगी संस्थेत वर्षातून एकदा ऑडिट केले जाते. अनेक संस्थांमध्ये तिमाही ऑडिट करण्याची देखील पद्धत आहे. या ऑडिटमुळे संस्थेमध्ये होणारे कामकाजावर लक्ष ठेवले जाते व तपासणी केली जाते. परंतु अशा प्रकारच्या ऑडिटमध्ये चुका वेळेवर लक्षात न आल्याने व त्या चुका वेळीच दुरुस्त न करता आल्याने गंभीर परिणाम देखील भोगावे लागतात. ही बाब लक्षात घेवून संचालक मंडळाने कोअर बँकींग प्रणालीद्वारे विकसीत झालेल्या कंट्रोल रूमच्या माध्यमातून केवळ दैनंदिन नव्हे "मिनिट-टू-मिनिट" ऑडिट करणारी यंत्रणा विकसीत केली आहे. याद्वारे कोअर बँकींगद्वारा सर्व व्यवहारांवर मुख्य कार्यालयात बसून नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.
प्रत्येक शाखेमध्ये होणारा प्रत्येक लहान मोठा व्यवहार कन्ट्रोल रूम मधून प्रत्येक मिनिटाला तपासाला जाईल विशेषतः "फॉरेन्सीक ऑडिट" या अंतरराष्ट्रीय ऑडिट सिस्टीमद्वारे अपहार किंवा गैरव्यवहार होणाऱ्या व्यवहारांवर त्याच मिनिटाला नियंत्रण ठेवणे शक्य होईल.
संपूर्ण महाराष्ट्रात बॅंकिंग चळवळीत अशा प्रकारची यंत्रणा विकसीत करणारी समता पहिलीच पतसंस्था आहे ही बाब अभिमानाने नमूद करावेसे वाटते.