समता पतसंस्थेने संस्थेच्या ग्राहकासाठी ICICI बँकेद्वारे प्रीपेड ए.टी .एम कार्ड देण्याची सुविधा सुरु केलेली आहे .सदर ए.टी .एम कार्ड वर समताच्या सेव्हिंग खातेतून जेव्हा आपणास पैसे हवे त्यावेळेस संस्थेच्या सेव्हिंग खातेस रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबर वरून 08030636290 या नंबर वर miscall दिल्यानंतर आपल्या ए.टी .एम कार्ड वर रक्कम जमा होईल व आपणास जमा झालेचा ICICI चा मेसेज येईल . त्यानंतर आपण कोणत्याही बँकेतून पैसे काढता येईल .
अशा पद्धतीने समताच्या कार्यप्रणालीमध्ये बदलत्या काळाप्रमाणे अत्याधुनिक तंत्रञान आणण्याचा प्रयत्न समताने केलेला आहे. या अत्याधुनिक प्रणालीद्वारे संस्थेला जास्तीत जास्त सुरक्षितता व ग्राहकांना जास्तीत जास्त गतिमान सेवा देण्याचा खात्रीपूर्वक प्रयत्न समता करणार आहे.